भूगोल म्हणजे काय?

भूगोल (Geography)म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक आणि मानवी घटकांचा अभ्यास करण्याचा एक महत्त्वाचं शास्त्र विषय आहे. दोन ग्रीक शब्दांपासून भूगोल हा शब्द बनला आहे. “Geo” म्हणजे पृथ्वी आणि “Graphy” म्हणजे वर्णन किंवा नकाशा.
पृथ्वीची रचना, हवामान,नद्या, पर्वत समुद्र, वाळवंट, मानवी, वस्ती, शेती, उद्योग, व्यापार यांची सखोल माहिती या शास्त्रामध्ये मिळते. म्हणजे निसर्ग आणि माणसांमधील परस्पर संबंध स्पष्ट करतो.
Table of Contents
वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या
| शास्त्रज्ञ | देश | व्याख्या |
| १) ॲरिस्टॉटल | ग्रीक | ऍरिस्टॉटल हा भूगोलाच्या अभ्यासातील अग्रगण्यांपैकी एक प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ मानला जातो. ॲरिस्टॉटलच्या मते पृथ्वीचा आकार स्थिती तिचे बौद्धिक गुणधर्म आणि नैसर्गिक घटना यांचा अभ्यास करणारे शास्त्र |
| २) एरटोस्थनीज | ग्रीक | एरटोस्थनीज या शास्त्रज्ञाला भूगोलशास्त्राचा जनक मानला जातो . भूगोल या शब्दाचा वापर सर्वप्रथम त्याने केला. तो एक ग्रीक शास्त्रज्ञ होता. एरॅटोस्थेनेस केलेली भूगोलची व्याख्या पुढीलप्रमाणे – ज्या शास्त्रामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास म्हणजेच ज्यामध्ये भूमी, पाणी, हवामान, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्या वितरणाचा आणि परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. |
| ३)अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट | जर्मनी | या विषयात पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक घटकांचा वैज्ञानिक अभ्यास असून त्यामध्ये त्या घटकांमधील परस्परसंबंध आणि त्यांच्या वितरणाचा विचार केला जातो. |
| ४) कार्ल रिटर (Carl Ritter) | जर्मनी | पृथ्वीवरील विविध प्रदेशांचा, त्यांच्या वैशिष्ट्यांचा आणि मानवजीवनाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणे. |
| ५) रिचर्ड हार्टशॉर्न (Richard Hartshorne) | अमेरिका | पृथ्वीच्या पृष्ठभागावरील घटकांचे अचूक, क्रमबद्ध आणि सुसंगत वर्णन करणे. |
| ६) पॉल विदाल द ला ब्लाश (Paul Vidal de la Blache) | फ्रांस | मानव आणि त्याच्या भौगोलिक वातावरणातील परस्परसंवादाचा अभ्यास. |
| ७). इमॅन्युएल द मार्तोन (Emmanuel de Martonne) | फ्रांस | नैसर्गिक आणि मानवी घटकांचा अवकाशीय वितरण व त्यांचे परस्पर संबंध यांचा अभ्यास. |
| ८). डॉ. आर.एल. सिंग (Dr. R.L. Singh) | भारत | पृथ्वीवरील विविध नैसर्गिक आणि मानवी घटकांचा परस्परसंबंध आणि त्यांच्या स्थानिक वितरणाचा अभ्यास.” त्यांच्या मते मुख्य उद्देश म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्परसंवाद समजून घेणे. |
| ९) डॉ. टी.एस. चॅपलिन (Indian context मध्ये कार्यरत) | भारत | केवळ पृथ्वीचा वर्णनात्मक अभ्यास नसून तो पृथ्वीवरील घटकांमधील स्थानिक संबंध स्पष्ट करणारा विज्ञान आहे. |
| १०) डॉ. एस.पी. चॅटरजी (Dr. S.P. Chatterjee): | भारत | “भूगोल हा पृथ्वीचा विज्ञान असून त्यात स्थानिक वितरण, संबंध आणि पर्यावरणाचा मानवावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो.” |
| ११) डॉ. पी. डे (Dr. P. Day) | भारत | मानव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील सतत चालणाऱ्या परस्पर संबंधांचा शास्त्रीय अभ्यास.” |
दोन मुख्य शाखा:
१) भौतिक भूगोल
या शास्त्रामध्ये निसर्गनिर्मित घटकांचा म्हणजे पर्वत , पठार ,नद्या ,महासागर, हवामान ,वातावरण, मृदा, वनस्पती इत्यादींचा अभ्यास केला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये:
- अभ्यासाचा विषय – पृथ्वीचा पृष्ठभाग, अंतर्गत रचना, हवामान, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पर्वत, मैदाने, नद्या, महासागर, हिमनद्या, ज्वालामुखी, भूकंप इत्यादी विषयांचा अभ्यास केला जातो.
- शास्त्रीय दृष्टिकोन – नैसर्गिक घटकांचे वैज्ञानिक विश्लेषण, मापन आणि वर्गीकरण करणे.
- परस्परसंबंध – विविध नैसर्गिक घटक एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा अभ्यास (उदा. हवामानाचा वनस्पतींवर, भूपृष्ठाच्या स्वरूपावर होणारा प्रभाव).
- मानवावर परिणाम – जरी भौतिक भूगोल मानवी घटकांचा थेट अभ्यास करत नाही, तरी नैसर्गिक घटक मानवाच्या जीवनशैलीवर आणि विकासावर कसा परिणाम करतात हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट करतो.
उपशाखा खालील प्रमाणे:
- स्थलरूपशास्त्र (Geomorphology): स्थलरूपशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या भौतिक स्वरूपांचा (landforms) आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास करणारी शाखा.
- जलविज्ञान (Hydrology): नद्या, सरोवरे, भूजल, हिमनद्या व समुद्रातील पाण्याचा अभ्यास.
- मौसमशास्त्र / हवामानशास्त्र (Climatology / Meteorology): वातावरण, हवामान, तापमान, पर्जन्य, दाब, वारे यांचा अभ्यास.
- महासागरशास्त्र (Oceanography): महासागरातील लाटा, भरती-ओहोटी, समुद्र प्रवाह, सागरी जीवसृष्टी यांचा अभ्यास.
- मृदाशास्त्र (Soil Geography / Pedology): मातीची निर्मिती, प्रकार, रचना, वितरण व शेतीशी नाते यांचा अभ्यास.
- जीवभूगोल (Biogeography): प्राणी व वनस्पतींचे वितरण, परिसंस्था (ecosystem), जैवविविधता यांचा अभ्यास.
२) मानवी भूगोल
ज्यामध्ये माणसाच्या कार्यकलापांचा अभ्यास म्हणजेच मानवनिर्मित आहेत म्हणजेच लोकसंख्या शहरे स्थलांतर शेती उद्योग वाहतूक व्यापार इत्यादी चा अभ्यास केला जातो.

मुख्य वैशिष्ट्ये:
- मानवकेंद्रित अभ्यास – माणूस व त्याच्या क्रियाकलापांचा अभ्यास करणे. यात मानवी समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था, राजकारण, उद्योग, व्यापार, वसाहती यांचा समावेश होतो.
- भौगोलिक पर्यावरणाशी संबंध – माणूस आणि निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. माणूस कसा निसर्गाचा उपयोग करून घेतो व त्यात बदल घडवून आणतो हे दाखवले जाते.
- सांस्कृतिक विविधतेचा अभ्यास – विविध प्रांतांतील लोकांचे धर्म, भाषा, परंपरा, रूढी, सामाजिक जीवनशैली, सांस्कृतिक विकास हे मानवी भूगोलाच्या अभ्यासाचे विषय आहेत.
- स्थानिक ते जागतिक स्तरावर अभ्यास – केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नसून स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील मानवी क्रियाकलापांचा विचार करणे.
- गतिक शास्त्र – स्थिर नसून बदलत्या परिस्थितीनुसार बदलतो. लोकसंख्येची वाढ, स्थलांतर, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे त्याचे स्वरूप सतत बदलत राहते.
- बहुविषयक स्वरूप – मानवी भूगोलाचा संबंध इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारणशास्त्र, नृविज्ञान अशा इतर शास्त्रांशी आहे.
- विकासाभिमुखता – माणसाच्या विकासाशी संबंधित आहे. संसाधनांचा वापर, शहरे व गावांचा विकास, वाहतूक, व्यापार, उद्योग यांचा मानवी प्रगतीशी संबंध दाखवतो.
उपशाखा खालील प्रमाणे:
- लोकसंख्या (Population Geography): लोकसंख्येची संख्या, घनता, वितरण, वाढ, जन्मदर-मृत्युदर, स्थलांतर यांचा अभ्यास.
- आर्थिक Economic Geography): शेती, खनिज, उद्योग, व्यापार, वाहतूक आणि मानवी उपजीविकेशी संबंधित क्रियांचा अभ्यास.
- राजकीय (Political Geography): राज्यांची सीमा, भौगोलिक स्थान, सामरिक महत्त्व, आंतरराष्ट्रीय संबंध व भूराजनीतीचा अभ्यास.
- सांस्कृतिक Cultural Geography): भाषा, धर्म, कला, प्रथा, परंपरा, लोकजीवन, वास्तुकला यांचा अभ्यास.
- शहरी (Urban Geography): शहरे, महानगरे, त्यांचा विकास, लोकसंख्या, वाहतूक, शहरी समस्या व नियोजनाचा अभ्यास.
- ग्रामीण (Rural Geography): खेडी, ग्रामीण लोकसंख्या, कृषीपद्धती, ग्रामीण अर्थव्यवस्था व सामाजिक रचनेचा अभ्यास.
- आरोग्य (Medical / Health Geography): रोगांचे वितरण, आरोग्य समस्या, वैद्यकीय सुविधा व पर्यावरणाशी नाते.
- वाहतूक व संप्रेषण (Transport & Communication Geography): वाहतूक मार्ग, रेल्वे, रस्ते, विमानसेवा, जहाजमार्ग व दळणवळण साधनांचा अभ्यास.